आयसीसी महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत, नवी मुंबईच्या डॉक्टर डीवाय पाटील क्रीडा अकादमीच्या मैदानावर काल झालेल्या उत्कंठावर्धक सामन्यात श्रीलंकेनं बांगलादेशचा 7 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेनं हसिनी परेराच्या 85 धावांच्या जोरावर सर्व बाद 202 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा डाव 50 षटकांत 9 बाद 195 धावांवर संपुष्टात आला. शेवटच्या षटकात विजयासाठी9 धावांची आवश्यकता असताना बांगलादेशनं पहिल्या चार चेंडूंत चार खेळाडू गमावले. या निकालामुळं श्रीलंकेच्या उपांत्य फेरीच्या आशा जिवंत राहिल्या आहेत, तर बांगलादेशचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे.
Site Admin | October 21, 2025 12:47 PM | Women Cricket World Cup
महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेचा बांगलादेशवर विजय
