भारताच्या महिला क्रिकेट संघानं आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. नवी मुंबईत काल झालेल्या थरारक उपांत्य सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर ५ फलंदाज राखून मात केली. ऑस्ट्रेलियानं दिलेलं ३३९ धावांचं लक्ष्य भारताच्या संघानं ५ फलंदाजांच्या मोबदल्यात ९ चेंडू राखून पूर्ण केलं.
नाणेफेक जिंकून प्रधम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ ४९ षटकं आणि ५ चेंडूंत ३३८ धावा करून माघारी परतला. फीबी लिचफील्ड हिनं ११९ धावांची खेळी केली, तर किम गार्थ आणि ॲनाबेल सदरलँड यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. प्रत्युत्तरादाखल, जेमीमा रॉडरिग्जच्या नाबाद १२७ आणि हरमनप्रीत कौर हिच्या ८९ धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं दिलेलं मोठं लक्ष्य भारताला पार करता आलं.
श्री चरणी आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी दोन फलंदाजांना तंबूत धाडलं. जेमीमा रॉडरिग्ज हिला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं. आता अंतिम फेरीत भारताची लढत शनिवारी नवी मुंबई इथं ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे.
 
									 
						 
									 
									 
									