डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

May 11, 2025 5:08 PM | Women Cricket

printer

Women Cricket : भारताविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेपुढं विजयासाठी ३४३ धावांचं लक्ष्य

महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत कोलंबो इथं श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारतानं श्रीलंकेपुढं विजयासाठी ३४३ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे.

 

भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला होता. भारतानं निर्धारित ५० षटकांमध्ये सात गडी गमावून ३४२ धावा केल्या. १०१ चेंडूत ११६ धावा करून शानदार शतक झळकावणाऱ्या स्मृती मानधनाने सर्वाधिक धावा काढल्या. तिचं एकदिवसीय क्रिकेटमधलं हे अकरावं शतक होतं. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करणारी ती तिसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. त्यानंतर हरलीन देओलनं ४७ धावा आणि जेमिमा रॉड्रिग्जनं ४४ धावा केल्या. श्रीलंकेकडून, मल्की मदारा, देवमी विहंगा आणि सुगंधिका कुमारी यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले तर इनोका रणवीरानं एक बळी घेतला.

 

हा सामना जिंकणं दोन्ही संघांसाठी महत्त्वाचं असून या वर्षाच्या अखेरीला होणाऱ्या महिलांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी ते महत्त्वाचं ठरणार आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा