महिला क्रिकेटमधे दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंकेवर ७६ धावांनी विजय

महिला क्रिकेटमधे तिरंगी एकदिवसीय मालिकेत, आज कोलंबो इथं झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं श्रीलंकेवर ७६ धावांनी विजय मिळवला. 

 

दक्षिण अफ्रिकेनं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकात ९ बाद ३१५ धावा केल्या. नेरी डेर्क्सननं १०४, तर क्लोई ट्रायॉननं ७४ धावा केल्या. श्रीलंकेतर्फे देवमी विहंगानं ५ बळी घेतले. विजयासाठी ३१६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव ४३ व्य़ा षटकातच २३९ धावांवर आटोपला.

 

चामरी अटापट्टुच्या ५१ आणि अनुष्का संजीवनीच्या नाबाद ४३ धावा वगळता श्रीलंकेच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. दक्षिण अफ्रिकेतर्फे क्लोई ट्रायॉननं ५ बळी घेतले. ती या सामन्यातली सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.