December 30, 2025 8:38 PM | Women's Cricket

printer

भारतीय महिलांकडून श्रीलंकेला १७६ धावांचं आव्हान

श्रीलंकेविरुद्धच्या टी-ट्वेंटी मालिकेतल्या अखेरच्या सामन्यात भारतीय महिला संघानं श्रीलंकेसमोर विजयासाठी १७६ धावांचं आव्हान ठेवलं आहे. तिरुवनंतपुरममध्ये सुरू असलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून श्रीलंकेनं क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारतीय डावाची सुरुवात खराब झाली. दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर सलामीवीर शफाली वर्मा ५ धावा बाद झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्यानं भारतीय फलंदाज बाद होत राहिल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरनं मात्र भारताचा डाव सावरला. ९ चौकार आणि १ षटकारच्या जोरावर तिनं ४३ चेंडून ६८ धावा केल्या. २० षटकात भारतीय महिलांनी ७ बाद १७५ धावा केल्या. या मालिकेत भारताकडे सध्या ४-० अशी आघाडी आहे.