महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कामाची व्याप्ती वाढवण्याचे निर्देश

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर महामंडळाच्या कामाची व्याप्ती वाढवण्याचे निर्देश महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत. काल मंत्रालयात यासंदर्भातल्या बैठकीत त्या बोलत होत्या. शहरी भागातील महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठीच्या योजनांसंदर्भातील प्रस्ताव सादर करावेत, महामार्गावरील जनसुविधा केंद्राच्या देखभाल तसंच व्यवस्थापनाची जबाबदारी महिला बचतगटांना देण्याबाबत तसंच या सुविधा केंद्रांमध्ये शौचालये, हिरकणी कक्ष, हस्तकला विक्री केंद्रे, अल्पोपहार यासारखे स्टॉल उभारण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना तटकरे यांनी दिल्या.