डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

March 22, 2025 8:45 PM | Onion Export

printer

कांदा निर्यातीवरचं २० टक्के शुल्क १ एप्रिलपासून हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

कांदा निर्यातीवरील २० टक्के शुल्क १ एप्रिलपासून हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. यासंदर्भातलं परिपत्रक केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या महसूल विभागानं जारी केलं. १३ सप्टेंबर २०२४ पासून हे शुल्क आकारण्यात येत होतं. २०२३-२४ या आर्थिक वर्षात देशातून १७ लाख मेट्रीक टनांहून अधिक कांदा निर्यात झाला आहे. चालू आर्थिक वर्षात १८ मार्चपर्यंत साडे ११ लाख मेट्रीक टनांहून अधिक कांद्याची निर्यात झाली आहे. लासलगाव आणि पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत या महिन्यात कांद्याची आवक वाढल्यानं दर कमी झाले आहेत.