विधानसभा निवडणुकीसाठी अवघे दहा दिवस शिल्लक राहिल्यानं प्रचाराला वेग

राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता केवळ दहाच दिवस उरले असल्यानं राजकीय पक्षांच्या प्रचारानं आता वेग घेतला आहे. प्रचारसभा, मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी, विविध संस्थांसोबतच्या बैठका याद्वारे उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.