संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी प्रधानमंत्र्यांचं संबोधन…

हिवाळी अधिवेशन ही फक्त एक औपचारिकता नसून त्याद्वारे देशाला विकासाकडे नेण्याच्या प्रयत्नांना चालना मिळते, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी ते वार्ताहरांना संबोधित करत होते. भारताचा आजचा आर्थिक विकास उल्लेखनीय आहे. या वाढीमुळे भारताला विकसित राष्ट्र बनण्याच्या मार्गावर चालण्याचा आत्मविश्वास आणि बळ मिळालं आहे, असं मोदी म्हणाले. 

 

१८व्या लोकसभेचं हे सहावं अधिवेशन आजपासून सुरू होत असून सर्व संसद सदस्य त्यांच्या सक्रिय सहभागाद्वारे लोकशाहीची परंपरा जपतील, अशी आशा लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशातून व्यक्त केली आहे. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.