संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत असून त्या पार्श्वभूमीवर सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे .यावेळी संसदीय कामकाज मंत्री किरेन रीजिजू लोकसभा आणि राज्यसभेतल्या सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. या हिवाळी अधिवेशनाचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सरकार सर्व पक्षाच्या सदस्यांना विनंती करेल, असं रिजीजू यांनी सांगितलं. हे अधिवेशन १९ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.या काळात विविध महत्वपूर्ण विधेयकांवर चर्चा होण्याची आणि ती मंजूर होण्याची शक्यता असून त्यामध्ये अणु विधेयक 2025 , विमा विधि संशोधक विधेयक , भारत उच्च शिक्षण आयोग विधेयक आणि राष्ट्रीय महामार्ग विधेयक आदींचा समावेश आहे . या अधिवेशनाच्या 19 दिवसांत संसदेच्या 15 बैठका होण्याची शक्यता आहे.
Site Admin | November 30, 2025 10:47 AM | Winter Session of Parliament
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक