‘राज्याची आर्थिक स्थिती ओढाताणीची, मात्र दिवाळखोरीकडे वाटचाल नाही’

राज्याची आर्थिक स्थिती ओढाताणीची असली, तरी राज्य दिवाळखोरीकडे चाललेलं नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूरच्या रामगिरी बंगल्यावर झालेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. विरोधकांनी परंपरा पाळत चहापानावर बहिष्कार टाकला. त्यांची पत्रकार परिषद निराशेनं भरलेली आणि त्रागा करणारी होती, अशी टीका त्यांनी केली. राज्यातल्या जवळपास ९० टक्के पूरस्थितीबाधित शेतकऱ्यांना मदतीची रक्कम पोहोचली असल्याचा दावा करून, शेतकऱ्यांना मदत न मिळाल्याचं विरोधकांचं विधान अभ्यास न करता केलेलं आहे, असं फडनवीस म्हणाले. या सगळ्या विषयांवर अधिवेशनात चर्चा करायला सरकार तयार आहोत, विरोधकांच्या प्रश्नाला समर्पक उत्तर देऊ, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.