राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपूर इथं सुरूवात होत आहे. विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतला. अत्यावश्यक सुविधा, निवारा,पार्किंग, सुरक्षा व्यवस्था वायफाय, टपाल तसंच आहार याबाबत प्रशासनानं उत्तम पद्धतीनं नियोजन केलं असल्याचं त्यांनी नागपूर इथं वार्ताहर परिषदेत सांगितलं. विधिमंडळ परिसरात अनावश्यक गर्दी होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, त्याचप्रमाणे मुंबईहून अधिवेशनासाठी येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दोन विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. या वार्ताहर परिषदेला विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे देखील उपस्थित होत्या. महाराष्ट्र विधान मंडळामध्ये दोन्हीही सभागृहात विरोधी नेते पदाचा प्रस्ताव प्रलंबित असल्याचं वार्ताहरांच्या प्रश्नाला उत्तर देताना शिंदे यांनी सांगितलं.
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी त्यांच्या रामगिरी निवासस्थानी विधीमंडळ सदस्यांना चहापानासाठी आमंत्रित केलं आहे. विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकल्याचं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर इथं वार्ताहर परिषदेत सांगितलं.