यंदाचं हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबरपर्यंत चालणार

संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी केंद्र सरकारने येत्या २४ तारखेला सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यन लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सरकार सर्व पक्षांकडून पाठिंबा मागणार आहे. यंदाचं हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबरपर्यंत चालणार आहे.