देशभरात आता हिवाळ्याची चाहूल लागत असून हिमाचल प्रदेशात रात्रीचं तापमान खाली आलं असून येत्या मंगळवार बुधवारी हिमवर्षावाची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरावरच्या कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव कमी होत आहे. येत्या मंगळवारपासून पाऊस ओसरेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
अंदमान आणि निकोबार द्वीप समूह, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, आणि बिहारमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता असून, उत्तर कोकण किनारपट्टी, पूर्व-मध्य आणि ईशान्य अरबी समुद्राचा काही भाग आणि अंदमानच्या समुद्रात आज वादळी वातावरण राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे.