भारतात ठीक ठिकाणी आज थंडीची लाट

महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर कर्नाटक, ओदिशा, तेलंगणा आणि मध्य प्रदेशात आज थंडीची लाट राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, चंदीगड, दिल्ली आणि हिमाचल प्रदेशात काही ठिकाणी वातावरणात दाट धुकं राहील. ईशान्य भारतात आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम, आणि त्रिपुरा मध्येही अशीच परिस्थिती राहील असा अंदाज आहे.  

 

अंदमान आणि निकोबार द्वीप समूहांवर आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून, यावेळी सोसाट्याचे वारे वाहतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. 

 

दरम्यान, दिल्ली परिसरात हवेची गुणवत्ता अत्यंत वाईट श्रेणीत असून, आज सकाळी हवेचा सरासरी गुणवत्ता निर्देशांक ३२९ इतका नोंदवला गेला.