विरोधकांचं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधानभवन परिसरात आंदोलन

विधीमंडळाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधानभवन परिसरात आंदोलन केलं. वाईट परिस्थितीमुळं शेतकरी आत्महत्या करत आहेत. सोयाबीन, कापसाला योग्य भाव नाही, धानाला बोनस नाही. त्यामुळं सरकारनं शेतकऱ्यांवरचा अन्याय दूर करावा, अशी मागणी विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.