देशाच्या विविध भागात थंडीचा कडाका वाढला आहे. जम्मू काश्मीरमधे गेले ४० दिवस सर्वात कमी तापमानाच्या नोंदी झाल्या आहेत. थंडी आणि बर्फात खेळण्याचा आनंद लुटण्यासाठी काश्मीरमधल्या सोनमर्ग, गुलमर्ग या प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी झाली आहे.
हिमाचल प्रदेशातही डोंगराळ भागात हिमवृष्टी आणि पावसामुळे तापमापकातला पारा घसरला आहे. मात्र येत्या सोमवारपर्यंत वातावरण स्वच्छ सूर्यप्रकाशयुक्त राहील असा हवामानविभागाचा अंदाज आहे. दिल्ली,राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आणि बिहारमधे थंडीची लाट आणि दाट धुक्याचं वातावरण राहील. तमिळनाडू, पुदुच्चेरी आणि कराईकल मधे मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे.
देशाच्या उत्तर भागात दाट धुक्यामुळे दृष्यमानता कमी झाल्याने रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दिल्लीच्या हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झालेली नाही.