विम्बल्डन टेनिस स्पर्धेत आज संध्याकाळी ऑल इंग्लंड क्लबवर उपांत्यपूर्व सामने होणार आहेत. पुरुषांच्या एकेरीत इटलीचा यानिक सिनर आणि अमेरिकेचा बेन शिल्डन यांच्यात लढत होणार आहे. तर दुसऱ्या उपांत्य पूर्व फेरीत इटलीचा फ्लेव्हियो कोबोली याची लढत २४ वेळा ग्रँड स्लॅम विजेत्या नोवाक जोकोविच याच्याशी होईल.
महिलांच्या गटात पोलंडची ईगा श्विएटेक हिचा सामना रशियाच्या ल्युडमिला सॅमसोनोव्हा हिच्याशी होईल. दुसऱ्या सामन्यात रशियाची मिर्रा अँद्रीवा आणि स्वित्झर्लंडची बेलिंडा बेनसिच यांच्यात लढत होईल.
दरम्यान, काल झालेल्या महिलांच्या एकेरीत अरिना साबालेन्का हिनं जर्मनीच्या लॉरा सीगमंड हिला पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर पुरुष एकेरीत दोन वेळचा विजेता स्पेनचा कार्लोस अल्काराझ यानं ब्रिटनचा कॅमेरून नॉरी याला हरवत उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे.