डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

विम्बलडन टेनिस स्पर्धा : रशियाच्या डॅनिएल मेदवेदेव उपांत्य फेरीत प्रवेश

इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विम्बलडन टेनिस स्पर्धेत डॅनिएल मेदवेदेव यानं जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या जानिक सिन्नेर याचा 6-7, 6-4, 7-6, 2-6, 6-3 अशा सेटमध्ये पराभव केला. या विजयामुळे जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या मोदवेदेवनं स्पर्धेतील उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. येत्या शुक्रवारी जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या कार्लोस अल्कराज बरोबर त्याचा सामना होणार आहे. महिला एकेरीत क्रोएशियाच्या डोना वेकीक हिनं न्युझिलंडच्या लुलू सन हिचा 5-7, 6-4, 6-1 असा पराभव केला. तिचा उपांत्य फेरीचा सामना सातव्या क्रमांकावर असलेल्या इटलीच्या जस्मिन पाओलीनी हिच्याबरोबर उद्या होणार आहे.