डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

विम्बल्डन टेनिस : पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत आज कार्लोस अल्कराजचा सामना डॅनियल मेदवेदेवशी होणार

विम्बल्डन टेनिस स्पर्धेत आज होणाऱ्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत  गतविजेता कार्लोस अल्कराजचा सामना डॅनियल मेदवेदेवशी होणार आहे. दुसरीकडे, रशियाचा पाचवा मानांकित मेदवेदेव यानं इटलीच्या अव्वल मानांकित यानिक जिनरवर विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. उपांत्य फेरीच्या आजच्या दुसऱ्या सामन्यात सात वेळा विजेता असणारा सर्बियाचा द्वितीय मानांकित नोवाक जोकोविचचा सामना इटलीच्या लोरेंजो मुसेटीबरोबर होईल. 

दरम्यान, महिला एकेरीच्या काल झालेल्या उपांत्य फेरीत बारबोरा क्रेचिकोवानं कजाकिस्तानच्या एलेना रबाकिनावर ३-६, ६-३, ६-४ असा विजय मिळवत प्रथमच विम्बलडनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात चेक गणराज्याच्या क्रेचिकोवाची गाठ  इटलीच्या   जस्मिन पाओलिनीशी पडणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.