विम्बल्डनमध्ये आज महिला एकेरीत अग्रमानांकित अरीना साबालेंका हिचा सामना एलीजे मर्टन्स हिच्याविरुद्ध रंगणार आहे. पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेला, गतविजेता कार्लोस अल्काराज याच्यासमोर आंद्रे रुब्लेव्ह याचं आव्हान असेल. तर पाचव्या क्रमांकावर असलेला टेलर फ्रिट्झ, जॉर्डन थॉम्पसन याच्याविरुद्ध मैदानात उतरेल. दरम्यान, या स्पर्धेत महिला एकेरीत काल क्लारा टॉसन हिनं अकराव्या क्रमांकावर असलेली एलेना रिबाकीना हिला थेट सेट्समध्ये हरवलं. तर पुरुष एकेरीत अग्रमानांकित यानिक सिनर यानं पेद्रो मार्टिनेझ याच्यावर ६-१, ६-३, ६-१ अशी सहज मात केली.
Site Admin | July 6, 2025 1:23 PM | Wimbledon | Wimbledon Tennis
विम्बल्डनमध्ये अरीना साबालेंका आणि कार्लोस अल्काराज यांचे सामने
