विंम्बल्डन टेनिस स्पर्धेत आज भारतीय खेळाडूंचे सामने होणार आहेत. पुरुष दुहेरीत आज युकी भांब्री आणि अमेरिकेचा रॉबर्ट गैलोवे यांच्या जोडीचा सामना पोर्तुगालच्या नूनो बोर्गेस आणि अमेरिकेच्या मार्कोस गिरोन या जोडीशी होणार आहे. तर भारताच्या एन.श्रीराम बालाजी आणि मेक्सिकोच्या मिगुएल एंजल रेयेस-वरेला या जोडीचा सामना अर्जेंटिनाच्या होरासिओ झेबालोस आणि स्पेनच्या मार्सेल ग्रॅनोलर्सशी होईल. भारताचा रित्विक चौधरी बोलिपल्ली आणि कोलंबियाचा निकोलस बॅरिएंटोस ही जोडी ब्रिटनच्या जो सॅलिसबरी आणि नील स्कुप्सकी यांच्याशी लढेल.
Site Admin | July 5, 2025 4:07 PM | Tennis | Wimbledon
विंम्बल्डन टेनिस स्पर्धेत आज भारतीय खेळाडूंचे सामने होणार
