विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत काल रात्री उशीरा संपलेल्या सामन्यात, यानिक सिन्नरने बाजी मारली आहे. तीन तास चार मिनिटे सुरू असलेल्या या थरारक सामन्यात सिन्नरने गतविजेत्या कार्लोस अल्कराझचा 4-6, 6-4, 6-4, 6-4 असा पराभव केला. विम्बल्डन स्पर्धेच्या 148 वर्षांच्या इतिहासात सिन्नर पहिलाच इटालियन विम्बल्डन विजेता आहे.
Site Admin | July 14, 2025 9:34 AM | Wimbledon 2025
विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत इटलीच्या यानिक सिन्नरची बाजी