July 11, 2025 1:33 PM | Wimbledon Tennis

printer

विम्बल्डनमध्ये पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत आज जोकोविच, यानिक सिनर, अल्काराज यांचे सामने

विम्बल्डनमध्ये पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यात आज नोव्हाक जोकोविच याच्यासमोर अग्रमानांकित यानिक सिनर याचं आव्हान असेल, तर दुसऱ्या सामन्यात कार्लोस अल्काराज आणि टेलर फ्रिट्झ आज एकमेकांविरुद्ध मैदानात उतरतील.

 

महिला एकेरीत काल झालेल्या उपांत्य सामन्यात अमांडा अनिसिमोव्हा हिनं अग्रमानांकित अरीना साबालेंका हिला पराभवाचा धक्का दिला. अटीतटीच्या सामन्यात अमांडा हिनं अरीना हिच्यावर ६-४, ४-६, ६-४ अशी मात केली. अजिंक्यपदासाठी आता तिच्यासमोर इगा श्वियांतेक हिचं आव्हान असेल. इगा हिनं बेलिंडा बेंचिच हिच्यावर ६-२, ६-० असा विजय मिळवला.

 

मिश्र दुहेरीत कॅतरीना सिनियाकोव्हा आणि सेम व्हरबीक या जोडीनं जो सॅलिसबरी आणि लुईसा स्टेफनी या जोडीचा ७-६, ७-६ असा थेट सेट्समध्ये पराभव करून अजिंक्यपदावर नाव कोरलं.