June 30, 2025 12:58 PM

printer

विम्बल्डन स्पर्धेला आजपासून प्रारंभ

टेनिस जगतातल्या प्रतिष्ठित विम्बल्डन स्पर्धेला आजपासून प्रारंभ होत आहे. १३ जुलैपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत विद्यमान विजेता कार्लोस अल्कराज, नोवाक जोकोविच, या खेळाडूंसह चार भारतीय टेनिसपटू सहभागी होत आहे. यामध्ये रोहन बोपण्णा, युकी भांबरी, ऋत्विक बोलिपल्ली, आणि श्रीराम बालाजी यांचा समावेश आहे. हे सर्वजण आपापल्या परदेशी जोडीदारांसोबत पुरुष दुहेरीत खेळणार आहेत.