गेल्या महिन्यात घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर किंचित वाढून २ पूर्णांक ३८ शतांश टक्के झाला. जानेवारीत हा दर २ पूर्णांक ३१ शतांश टक्के होता. वनस्पती तेल, चहा, कॉफी यासारख्या पदार्थांचे दर वाढल्यानं ही वाढ झाली असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आज प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे. भाजीपाल्याचे दर मात्र गेल्या महिन्यात खाली आले. त्यामुळे खाद्यान्नासाठीचा हा दर ७ पूर्णां ४७ शतांश टक्क्यावरुन ५ पूर्णांक ९४ शतांश टक्क्यापर्यंत घसरला. विशेषतः बटाट्याच्या दरात ७४ पूर्णांक २८ शतांश टक्क्यावरुन २७ पूर्णांक ५४ शतांश टक्के इतकी घसरण झाली. इधंन आणि उर्ज क्षेत्रातही लक्षणीय घसरण झाली.
Site Admin | March 17, 2025 8:11 PM | Wholesale Price Index
घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा फेब्रुवारीचा दर 2.38 टक्के
