दिल्लीतल्या एम्समध्ये महामारी तयारी तसंच आपत्कालीन प्रतिसाद केंद्राचा WHO नं केला प्रारंभ

जागतिक आरोग्य संघटनेनं नवी दिल्लीतल्या एम्समध्ये आज महामारी तयारी तसंच आपत्कालीन प्रतिसाद केंद्राचा प्रारंभ केला.  महामारी किंवा साथीचे आजार उद्भवल्यास तातडीनं सार्वजनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी तपासणी आणि संशोधन करता यावं म्हणून अनेक देशात अशी केंद्र उभारण्यात आल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिली आहे. हे केंद्र महामारी नसलेल्या काळातही कार्यरत राहील जेणेकरून ही प्रणाली संकटकाळात प्रतिसाद देण्यासाठी सज्ज राहील, असं एम्स चे संचालक डॉ एम श्रीनिवास यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.