December 21, 2025 2:58 PM | whatsup

printer

व्हॉटस्अप हॅक होण्याची शक्यता

व्हॉटस्अप वापरकर्त्यांसाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सूचना जारी केली असून, घोस्टपेअरिंग नावाच्या सायबर मोहिमेचा वापर व्हॉटस्अप खाती हॅक करण्यासाठी केला जात असल्याचं त्यात नमूद करण्यात आलं आहे. गुन्हेगार किंवा हॅकर्स प्रमाणीकरणाची आवश्यकता नसलेल्या पेअरिंग कोडचा वापर करून खाती हॅक करण्यासाठी डिव्हाईस लिंकिंग वैशिष्ट्याचा गैरफायदा घेत असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. वापरकर्त्यांनी कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये तसेच बाह्य संकेतस्थळावर आपला मोबाईल क्रमांक देऊ नये असे आवाहन केले आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.