January 6, 2026 3:26 PM

printer

पश्चिम रेल्वे १८ डब्यांच्या उपनगरी गाड्यांची चाचणी जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात करणार

१८ डब्यांच्या उपनगरी गाड्यांची चाचणी जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात मध्यात करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतला आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेत बहुतेक गाड्या या १२ डब्यांच्या आहेत, तर मध्य आणि पश्चिम मार्गावर १५ डब्यांच्या गाड्याही धावतात. आता विरार ते डहाणू या टप्प्यात १८ डब्यांच्या दोन उपनगरी गाड्यांची चाचणी १४ आणि १५ जानेवारी रोजी होणार आहे. यात, आपत्कालीन परिस्थितीत गाडी किती लवकर थांबू शकते, हे तपासण्यासाठी ईबीडी, तर ब्रेक लावताना कपलरवर पडणारा दबाव तपासण्यासाठी सीएफ अशा दोन चाचण्या केल्या जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. कोणतीही नवी गाडी सुरू करण्यापूर्वी या दोन चाचण्या करणं अनिवार्य आहे.