डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 22, 2025 8:11 PM | Western Railway

printer

वांद्रे टर्मिनस आणि पालीताना स्थानकादरम्यान विशेष सुपरफास्ट गाडी चालवण्याचा पश्चिम रेल्वेचा निर्णय

प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन वांद्रे टर्मिनस आणि पालीताना स्थानकादरम्यान विशेष सुपरफास्ट गाडी चालवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतला आहे. विशेष भाडे आकारून चालवण्यात येणारी, बांद्रा टर्मिनस-पालीताना सुपरफास्ट स्पेशल, ही गाडी उद्या संध्याकाळी ७ वाजून २५ मिनिटांनी वांद्रे स्थानकातून रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजून २५ मिनिटांनी गुजरातमधल्या पालिताना इथं पोहोचेल. त्याचप्रमाणे पालीताना-बांद्रा टर्मिनस सुपरफास्ट स्पेशल ही गाडी २४ नोव्हेंबरला पालिताना इथून रात्री साडे आठ वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पावणे अकराला वांद्रे टर्मिनस इथं पोहोचेल.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.