प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन वांद्रे टर्मिनस आणि पालीताना स्थानकादरम्यान विशेष सुपरफास्ट गाडी चालवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतला आहे. विशेष भाडे आकारून चालवण्यात येणारी, बांद्रा टर्मिनस-पालीताना सुपरफास्ट स्पेशल, ही गाडी उद्या संध्याकाळी ७ वाजून २५ मिनिटांनी वांद्रे स्थानकातून रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजून २५ मिनिटांनी गुजरातमधल्या पालिताना इथं पोहोचेल. त्याचप्रमाणे पालीताना-बांद्रा टर्मिनस सुपरफास्ट स्पेशल ही गाडी २४ नोव्हेंबरला पालिताना इथून रात्री साडे आठ वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पावणे अकराला वांद्रे टर्मिनस इथं पोहोचेल.
बोरीवली, पालघर वापी, वलसाड, नवसारी, सूरत, वडोदरा, आणंद, अहमदाबाद, बोटाद, धोला, सोनगढ आणि सिहोर इथं या गाडीला थांबा देण्यात आला आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेनं दिली आहे.