October 13, 2024 3:56 PM | Western Railway

printer

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल स्थानकात आज दुपारी बारा वाजताच्या सुमाराला एका रिकाम्या लोकल ट्रेनचे दोन डबे रुळावरून घसरले. लोकलमध्ये प्रवासी नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे चर्चगेट वरून मुंबई सेंट्रलच्या दिशेने जाणारा धीमा रेल्वेमार्ग सध्या वाहतुकीसाठी बंद केला होता या मार्गावरच्या नियोजित गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येत आहेत.