हिंदी महासागरात अडीच हजार किलो अंमली पदार्थ जप्त

भारतीय नौदलाच्या आयएनएस तर्कश या लढाऊ जहाजाने पश्चिम हिंद महासागरात अडीच हजार किलो अंमली पदार्थ जप्त केले. पश्चिम हिंद महासागरात एक जहाज संशयास्पदरित्या आढळल्याची माहिती भारतीय नौदलाच्या पी ८ आय विमानानं आयएनएस तर्कशला दिली होती.

 

हे जहाज अमली पदार्थ वाहून नेत असल्याचा संशय होता. त्यामुळे आयएनएस तर्कशने आपला मार्ग संशयित जहाजाच्या दिशेने बदलला. या जहाजाची चौकशी करून तिला अडवण्यात आलं. जहाजाची तपासणी केल्यानंतर त्यात अमली पदार्थ सापडले.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.