पश्चिम बंगालमध्ये मुर्शिबाद जिल्ह्यात वक्फ सुधारणा कायदा २०२५ विरोधात काल झालेल्या हिंसाचारात ३ जणांचा मृत्यू झाला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकांना संयम राखण्याचं आवाहन केलं आहे. तोडफोड करणाऱ्यांना शिक्षा केली जाईल तसंच वक्फ सुधारणा कायदा २०२५ पश्चिम बंगालमध्ये लागू केला जाणार नाही असं त्यांनी समाजमाध्यमावर केलेल्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे. तर मुर्शिदाबाद जिल्ह्यातल्या हिंसाचारामध्ये सरकारनं हस्तक्षेप करणं आवश्यक असल्याचं भाजपा प्रदेशाध्यक्ष सुकांता मजुमदार यांनी म्हटलं आहे. पश्चिम बंगालचे पोलिस महासंचालक राजीव कुमार यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. प्रभावित भागात निमलष्करी दल तैनात करण्यात आलं असून मुर्शिबादमध्ये शमशेरजंग, जलंगी, लालगोला आणि धुलियान इथं परिस्थिती नियंत्रणात आहे. या हिंसाचार प्रकरणी ११८ जणांना अटक करण्यात आली आहे.
Site Admin | April 12, 2025 8:07 PM | Waqf Amendment Act 2025
West Bengal-WAQF 2025 : हिंसाचारात ३ जणांचा मृत्यू
