न्यूयॉर्कच्या पश्चिम भागातल्या न्यूयॉर्क स्टेट थ्रूवे इथं एका प्रवासी बसचा अपघात होऊन पाच जणांचा मृत्यू झाला आहे. नायगारा फॉल्सकडून न्यूयॉर्ककडे जाताना चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला.
बसमध्ये ५२ प्रवासी होते, काहींना बसमधून बाहेर काढण्यात यश आलं आहे तर काही जण अद्यापही बसमध्ये अडकल्याची भीती आहे.