October 6, 2024 1:10 PM | Weather Update

printer

देशात काही भागात पावसाचा अंदाज

देशाच्या ईशान्य आणि दक्षिण भागात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. देशाच्या वायव्य, पश्चिम आणि मध्य भागात मात्र पावसाची शक्यता नसल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल, केरळ, माहे, रायलसीमा, आणि कर्नाटकच्या किनारी आणि दक्षिणभागात पुढचे २ दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार, झारखंड, कोकण, गोवा, मराठवाडा, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये काही ठिकाणी आज विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.