October 13, 2024 8:34 PM

printer

नैर्ऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास येत्या दोन दिवसात पूर्ण होईल

नैर्ऋत्य मोसमी पाऊस बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड आणि सिक्कीममधून पूर्णपणे परतला असून छत्तीसगढ, मध्यप्रदेश, मेघालय, आसाम आणि ओदिशातल्या आणखी काही भागातून मागे सरला आहे. येत्या दोन दिवसात मान्सून देशातून पूर्णपणे परतेल असा हवामानविभागाचा अंदाज आहे.

येत्या दोन दिवसात तमिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ आणि आंध्र किनारपट्टीवर जोरदार पाऊस पडेल तर गुजरात, महाराष्ट्र, गोवा, मध्यप्रदेश, आणि छत्तीसगढमधे पुढचा आठवडाभर हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे.