October 10, 2024 7:15 PM | Weather Update

printer

राज्यात उद्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

राज्यात उद्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे.

कोल्हापुरात आज दुपारी वीजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे या पावसामुळे हाल झाले. पावसामुळे संपूर्ण शहर आणि परिसरात पाणी साचलं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.