मध्यप्रदेश आणि राजस्थानात आज जेरदार पाऊस

देशाच्या उत्तर भागात पश्चिमेकडच्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे उत्तरेकडच्या थंड वाऱ्यांना काहीसा पायबंद बसला आहे. हिमाचल प्रदेशात हवामान कोरडं असून मोसमातल्या पहिल्या हिमवृष्टीची प्रतीक्षा पर्यटक करीत आहेत. पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे जम्मू काश्मीर आणि लडाखमधे कडाक्याची थंडी आहे. तापमापकातला पारा लडाखमधे उणे ११ च्या आसपास पोहोचला तर काश्मीरमधे उणे ६ पर्यंत घसरला. मध्यप्रदेश आणि राजस्थानात आज जेरदार पाऊस