हरयाणा, दिल्ली, पंजाब आणि बिहारमधे काही ठिकाणी थंडीची लाट

हरयाणा, दिल्ली, पंजाब आणि बिहारमधे काही ठिकाणी थंडीच्या लाटेसारकी परिस्थिती राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. पूर्व उत्तर प्रदेश, ओदिशा, पश्चिम राजस्थानमध्ये काही ठिकाणी खूप दाट धुकं पडण्याची शक्यताही वर्तवली आहे. आसाम, मेघालय, बिहार, पूर्व राजस्थान, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, लडाख, झारखंड, नागालँड, मणिपूर, मिझोराम, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, सिक्कीम या राज्यांच्या काही भागातही दाट धुकं पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.