देशाच्या उत्तर भागात थंडीचा जोर
देशाच्या उत्तर भागात थंडीचा कडाका वाढला आहे. जम्मू- काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि हिमालयीन प्रदेशात हिमवृष्टी होत आहे. पश्चिमी वाऱ्यांच्या अभावामुळे राजधानी दिल्लीसह उत्तरेच्या राज्यांमधे तापमानात घट झाली असून धुक्याची दाट चादर पसरली आहे. दृष्यमानता कमी झाल्यामुळे रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दिल्ली विमानतळावरची १४८ उड्डाणं आज रद्द करण्यात आली. उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, हरियाणा, राजस्थान, छत्तीसगड ही राज्य थंडीने गारठली असून सर्वत्र धुक्याचं राज्य आहे. महाराष्ट्रातही किमान तापमानात घट झाली असून आज सकाळी राजधानी मुंबई आणि उपनगरातही दाट धुकं होतं.