अरुणाचल प्रदेश, बिहार, पूर्व राजस्थान, पश्चिम बंगाल, गुजरात, झारखंड, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, ओडिशा, उत्तराखंड, आणि मध्यप्रदेशात आज जोरदार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. उर्वरित राज्यांमध्येही येत्या २ ते ३ दिवसांसाठी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. ईशान्येकडच्या राज्यांसहित उत्तर भारतात काही ठिकाणी, तसंच ओडिशा आणि तेलंगणात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पश्चिम बंगाल, कोकण, गोवा, ओडिशा, सौराष्ट्र आणि कच्छ भागात सोसाट्याच्या वाऱ्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
Site Admin | August 22, 2025 1:33 PM | Weather Update
देशातल्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा
