डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 20, 2025 3:02 PM | Weather Update

printer

देशाच्या विविध भागात मुसळधार पावसाचा अंदाज

मध्य प्रदेशाच्या आग्नेय भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं उत्तर कर्नाटकात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बेळगाव आणि उत्तर कन्नड जिल्ह्यांमध्ये सतत जोरदार वारे वाहण्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. 

 

उत्तराखंडाच्या विविध भागात गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाचा जोर आज कमी झाला आहे. हवामान खात्यानं येत्या काही दिवसांत पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली असून येलो अलर्ट जारी केला आहे. पुढचे तीन दिवस उत्तराखंड राज्यात अनेक भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पाऊस आणि भूस्खलनामुळे उत्तराखंडमधले सुमारे १५० रस्ते बंद आहेत. 

 

हिमाचल प्रदेशात अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडत आहे. खराब हवामानामुळे आज राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. धरणांच्या पाण्याची पातळी वाढत असल्यानं नियमितपणे पाणी सोडण्यात येत आहे. लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.