डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 24, 2024 10:37 AM | IMD | Weather Update

printer

कोकण, कर्नाटक आणि गोवा किनारपट्टी लगतच्या भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा

कोकण, कर्नाटक आणि गोवा या सागरी किनारपट्टी लगतच्या राज्यांना आज मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर उत्तर कर्नाटक,मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्येही आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

 

केरळ, आंध्रप्रदेश किनारपट्टी, रायलसीमा, तेलंगण, गुजरात, ओडिशा, अरुणाचल प्रदेश, नागालँड, माणिपूर, मिजोरम, त्रिपुरा, मध्यप्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगढ मध्येही आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.