डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राज्यात येत्या तीन दिवसात जोरदार पावसाचा अंदाज

 राज्यात येत्या तीन दिवसात तुरळक ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ३० पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

कोकणात मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रात – पुणे , नाशिक, जळगाव, धुळे, सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर, मराठवाड्यात – छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, परभणी, धाराशिव, तर विदर्भात – नागपूर, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांना हवामान विभागानं यलो अलर्ट दिला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.