डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

केरळ किनारपट्टी भागात पुढचे 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

पुढचे पाच दिवस कोकण, गोवा, कर्नाटक आणि केरळ तसंच आसपासच्या भागात जोरदार ते अती जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. ईशान्य भारत, पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या हिमालयीन भागातही वादळी वारे आणि वीजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

राजस्थानच्या पश्चिम भागात मात्र आणखी चार दिवस उष्णतेची लाट कायम राहील तर ओडीशामध्ये उष्ण आणि दमट हवामान असेल. येत्या दोन दिवसांत जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद आणि हिमाचल प्रदेशात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. मान्सून पुढे सरकण्यासाठी सध्या अनुकूल वातावरण असून पुढच्या 2-3 दिवसांत बंगालच्या उपसागरात आणखी पुढे सरकेल असं हवामान विभागानं म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.