डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

July 6, 2025 1:29 PM | wether update

printer

उत्तराखंड, राजस्थान, उत्तर प्रदेश, कोकण, गोवा, गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

दिल्लीतील काही भागांमध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे तीव्र उकाड्यापासून दिल्लीकरांना दिलासा मिळाला आहे. हरियाणा, चंदीगड, पंजाब आणि हिमाचल प्रदेशसाठी ८ जुलैपर्यंत हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हिमाचल प्रदेशात पावसाचे थैमान सुरूच आहे. आज सकाळपासून राज्याच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस पडत आहे. हवामान विभागाने मंडी, कांग्रा आणि सिरमौर जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे, तसंच शिमला, सोलन, हमीरपूरसह नऊ जिल्ह्यांमध्ये पुढल्या २४ तासांसाठी पुराची शक्यता व्यक्त केली आहे. यानुसार, प्रशासनाने लोकांना सावधानतेचा इशारा दिला असून अनावश्यक प्रवास टाळायचा सल्ला दिला आहे. उद्याही हिमाचल आणि मध्य महाराष्ट्रातल्या घाट माथ्यावर अतिवृष्टीची शक्यता असून, उत्तराखंड, राजस्थान, उत्तर प्रदेश, कोकण, गोवा आणि गुजरातमध्येही काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.