June 7, 2025 3:13 PM | IMD

printer

हवामान विभागाकडून मुंबई आणि रायगडमध्ये रेड तर पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट

हवामान विभागानं मुंबई आणि रायगड जिल्ह्यासाठी आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत रेड अलर्ट, तर पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 

 

येत्या दोन दिवसांत पालघर, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्राचा काही भाग वगळता संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाची शक्यता असून, हवामान विभागानं या ठिकाणी यलो अलर्ट जारी केला आहे.

 

सांगली जिल्ह्यात मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ, पलूस आणि वाळवा तालुक्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडत आहे. पावसामुळे सांगलीमधल्या आठवडी बाजारात आज भाजीपाला विक्रेत्यांची आणि नागरिकांची गैरसोय झाली.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.