May 1, 2025 7:36 PM | weather updat

printer

गेल्या चोवीस तासात राज्यात ठिकठिकाणी तापमानात वाढ

गेल्या चोवीस तासात कोकण, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात किंचित वाढ झाली. 

 

राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अकोला इथं ४५ अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं.

 

येत्या दोन दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे.