विदर्भ, राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेश, ओदिशा आणि छत्तीसगडमध्ये पुढले दोन दिवस उष्णतेची लाट राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
कोकण, मराठवाडा, गोवा, गुजरात, बिहार, झारखंड, केरळ, माहे, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल आणि रायलसीमा मध्ये आज उष्ण आणि दमट हवामान राहील असा अंदाज आहे.
अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयात तुरळक ठिकाणी आज मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.